Friday, November 19, 2010

संध्याकाळपर्यंत

रोजचीच लोकल....
रोजचीच गर्दी...
पण तरीही प्रत्येक चेहरा अनोळखी...
आपल्याच धुंदीत हरवलेला..
कुठे भजनाचे सुर...कुठे भांडणाचे...
मी मात्र तसाच अडकुन...
चौथ्यासिटवर 
विंडोव सिटची स्वप्न पाहात...
नेहमी आखुन दिलेल्या,
रिंगणात धावत राहायचे...
भिंगरीसारखं...
प्राक्तनाच्या एका पायावर...
तोल सावरत...
अन स्टेशन आलं
की त्या प्लँटफॉर्मवरच्या
गर्दीत पुन्हा हरवुन जायचं...

संध्याकाळपर्यंत.........

ओंकार

1 comment: