Thursday, November 4, 2010

काय माहीत....का?

तु काळजी घेतेस...
म्हणुन कधी कधी मुददाम धडपडायला आवडतं..
तु धावत येतेस...अश्रु पुसायला..
म्हणुन कधी कधी उगाच टिपं गाळायला आवडतं
काळ्याभोर डोळ्यांची कवाडे...
अलगद उघडलीस...अन
तुझ्या डोळ्यात मी हरवुन गेलो....
त्या डोळ्यांची स्तुती..करता...
मी ही कवी बनुन गेलो.
आजही अलगद मिठीत शिरतेस...
तेंव्हा..सारं भान विसरतो..मी..
नेहमीचं ते जिणं....चौकटीतले विसरुन...
तुझ्यात स्वतःला हरवतो मी...
माझा प्रत्येक श्वास ...
एक नवी कवीता बनतो...
तुझ्याच साठी...लिहीतोय...मी..
म्हणुन तर कवीता रचत जातो..
वहीचे शेवटचं पानं...
मी नेहमीच मोकळं सोडायचो..
तुझ्या माझ्या मिलनाची स्वप्न रंगवत...
कधी तरी तुझ्यासोबत..
माझे नाव लिहीन..ह्या खुळ्या आशेवर..
प्रेम....बिम सारं झुट...
नेहमीच लोक बोलतात...
आजवर कधी पटलं नव्हतं..
अन पटेल...असंही कधी वाटलं नव्हतं
तुझे..ते रक्त...
माझं ते...लाल पाणी...
मग हाच न्याय वापरुन...
माझं प्रेम नक्कीच...
तुझ्या त्या नाटकापेक्षा...जास्त होतं
त्या गर्दीत...तुला पाठमोरं....
चालताना पाहुन...
आजही काळजात धस्स...होतं...
काय माहीत....का?
आतातर वाटाही वेगळ्या झाल्यात...
तरी पण अस होत?
गर्दीतला एकटेपणा.
बोचरा असतो...
अबोल असुनही...
खुपदा...बोलका असतो.

ओंकार..

1 comment: