Monday, November 29, 2010

संध्याकाळच्या वेळी..

संध्याकाळाची गर्दी....
अन ...वाटत..असते...
आता तु यावस..
अन हलकेच मला बिलगावं.
अन डोळ्यांतले प्रेम तुझ्या..
डोळ्यानेच वाचावं
तुझ्या असण्याचा भास..
खुपदा..मला बोलकं करतो..
त्या सागरकिनारी..
असतो जेंव्हा एकटा..
तेंव्हा....
तुझ्या..माझ्या मिलनाच्या गोष्ठी,,,
वारा कानात सांगुन जातो
संध्याकाळच्या वेळी...
आजही तिची आठवण येते,,,
सखे..आहेस तिथुन धावत ये..
तुझी कातर आठवण..
थरथरत राहाते..
आकाशातला तो तप्त दिप....
मालवुन टाक..
सखे...माझ्या मिठीत येताना..
सारी बंधने तोडुन टाक
तुझ्या आठवांच
आता मी काय करु?
त्यातल्या भावनांच
निष्प्रभ झाल्यात...
लिहुन लिहुन...
तुझ्या आठवणी...
माझ्या कवीतांच्या वह्याच
निळ्या झाल्यात.
काळजाचा प्रत्येक कप्पा..
रिता करुन झालोय मी..
तुला विसरण्याचा प्रयत्न
कित्तेकदा..करुन झालोय मी.
त्या...संधीप्रकाशातही..
आकाशीचा चंद्रमा...
चांदण्यात गुरफटत होता..
खुळ्या तव आठवांना..
पंख लावुन जात होता
अस्ताला जाणारा सुर्य
आज न जाणे
का? असा वागत होता..
त्या सरत्या वाटेसरशी..
तुझ्या आठवांचे काहुर,
मनात उठवत होता

ओंकार

2 comments: