अजुन किती दिवस फिरायचं प्रत्येक ऑफीसात जाऊन कितींदा.. तेच रामायण.. सगळे ऐकुन घेऊन बॉस विचारणार... रामाची सिता कोण? आयचा घो... काय येते? कोणच विचारत नाही... नाही येतं काय? सगळी यायीच चर्चा... तिही उगाचच.. सगळं येत असतं तर आज तुझ्या जागी मी असतो.. बरं त्यानंतर प्रश्न पडतो समोर... नोकरी मिळेल.... पण किती देणार? ह्याचे उत्तर मी काय देणार? समोरुन सांगतात दहा दिवसात सांगु.. मी तसाच उठुन चालु लागतो..पुढच्या इंटरर्व्हुच्या दिशेने.
No comments:
Post a Comment