(Singleton Mother)
सा-यांच्या नजरेत.
केवळ पापी...
अन शिव्यांची लाखोली..
माझ्या कपाळी कायमच वाहीलेली..
का?
कोणी सांगेल का?
माझेही प्रेम होते अन त्याचेही...
अन आहे आजही
आजन्म राहील...मग तरीही?
का?????
हाच केवळ प्रश्न कायम तोडणारा...
माझ्या मनाच्या तटबंदीला
रोज एक नवा सुरुंग
लावतोय हा समाज...
असं कुठलं मोठं पाप केलयं
बस..एकच...
मी आई झालीय...
बरोबर न?
ह्यात कसली चुक..
प्रेम..त्याचेच दुसरे रुप न हे....
मग तरीही...
ती बघा ना..ती ही एक आई.
तीच्याही पोटात तसाच एक जिव..
अगदी माझ्यासारखाच...
तिच्यात नी माझ्यात
कसलाच फरक नाही...
शोधुनही सापडणार नाही...
बस...एकच अंतर ....
त्या भांगात भरलेल्या कुंकुवाचे....
अन त्यासोबत माझ्या पोटातल्या बाळाला
मिळणा-या बापाच्या नावाचे...
बस..............
ओंकार
hummm ......... vichar karayala lavanari kavita ...... kharach ka??? ....... tichya drushtine tine kahi vait kelele nasate mag ha samaj ka tila valit takato?
ReplyDelete