Saturday, April 23, 2011

तु मात्र.....

हिरावुन घेशीलही कदाचित..
अस्तित्व माझे..तुझ्या
मनांतले...स्वप्नांतले..
पण तरीही राहीनच कायम...
चिरंतन काळासाठी..
मग चिडशील कदाचित...
"स्वतःवरच"..
अन गुरफटुनही जाशील
कदाचित...
पुन्हा..
पुन्हा..त्याच जुन्या आठवांत..
पुन्हा एकदा जगण्यासाठी...
हसण्यासाठी..कदाचित...
मला विसरण्यासाठीच..
हो ना?
डोळ्यांतले अश्रु दाबुन ठेवण्याची तुझी..
ती जुनीच सवय..
आता बरीचशी अंगवळणी पडलीय...
ठाऊक आहे...तु..मनातले तुझ्या..
कोणालाच सांगणार नाहीस..
मनातला विचारांचा...
तो पेटता निखारा..
असाच उराशी बाळगुन
आजन्म राहशील..
निर्धाराने....लढशीलही कदाचित...
पण तरीही....एकच प्रश्न उरतोय..
विसरु शकशील का मला?
तोच मनांतला गुंता..
माझ्या असण्याचा...नसण्याचा...
एकत्र जगलेले...सोनेरी भावक्षण..
तेही आयुष्यभराची शिदोरी बनलेले..
तोच आठवांचा..एकांत..
भर गर्दीतही तुला एकटेच सोडुन जाणारा..
माझे अस्तित्व...तुझ्याजवळचं..
डोळ्यांसमोरुन अनाहुतपणे निसटणारं
त्या खुळ्या -हुदयाची स्पंदन
अजुनही...एकांतात माझेच नाव घेणारी..
अन तरीही तु बोलतेस..
तु मात्र.....
माझ्यातल्या "तू"ला
माझ्यापासूनच हिरावू पाहतोयस......

ओंकार

2 comments: