गुंतलेलं मनं बिरागी.
मानता मानेना....
एकांतात आज का..
मला शांतता लाभेना.
स्वतःच्या सावलीस आज.
नजर ओळखीना...
साराचं गुंता मनीचा हा कैसा...
सुटता सुटेना...
कोंडलेले विचार सारे...
आज मुक्त झाले...
एक एक रुप वेडं..
त्या खुळ्यांनी दाखवले,
त्या विचारांचा आदी-अंत...
ह्याचा थांगपत्ता लागेना...
साराचं गुंता मनीचा हा कैसा...
सुटता सुटेना...
गुंतलेला प्राण..आज..
पाप पुण्याच्या गर्तेत...
खुणावती....श्वास..मोल...
कवडीमोल...गुर्मीत...
त्या श्वासांचे गुढ गणीत
काही केल्या सुटेना...
साराचं गुंता मनीचा हा कैसा...
सुटता सुटेना...
ओंकार
Friday, February 4, 2011
विस्तव
येणारा...तोच उग्र गंध..
ओळखीचा असेलच तुमच्या...
नसलातरी,
जाऊदेना....त्याचं तुम्हाला काय?
सारंच अनपेक्षीत...
माझं अस्तित्व....विखरलेलं..
राख बनुन...
माझं मीच मला थांबवलं होतं..
त्या एका छोट्याश्या विस्तवाने
मला जाळलं होतं
मला जाळलं होतं
प्रत्येक पावलांगणीक...
पुसट होत जातील माझ्या आठवणी.
पुसट होत जातील माझ्या आठवणी.
अन विस्मरणातही जाईन असाच...
तरीही उरेन कदाचीत...
खोल -हुदयात...पुन्हा अंकुरण्यासाठी...
पण तुमचं प्रत्येक पाऊल
वाटेवरच्या राखेत माखलं. होतं..
वाटेवरच्या राखेत माखलं. होतं..
त्या एका छोट्याश्या विस्तवाने
मला जाळलं होतं
मला जाळलं होतं
माझं असणं माझं नसणं..
क्षणभंगुर....
हे ही त्या विस्तवानेच ठरवलं होतं..
क्षणभंगुर....
हे ही त्या विस्तवानेच ठरवलं होतं..
ओंकार
Tuesday, February 1, 2011
आज सांगू दे माझ्या व्यथा.
व्यथा काहीश्या कुस्करलेल्या...
काहीश्या वाळलेल्या..
काहीश्या गंधीत आठवांत तुझ्या..
काहीश्या...निर्जीव झालेल्या...
व्यथा...अबोल होऊन थिजलेल्या...
कोणी देतो नाव..प्रेमाचं.
कोणी देतो...नाव भक्तीचं..
कोणी जपतो...जुन्या पानांत..
कोणी फेकतो...कच-यात...
माझ्या मनाचा ठाव
कधी कुणा न लागला...
जपलेला काटा उराशी
खोल काळजात लागला...
कोणीतरी बोलले की
फुलांना भावना नसतात...
दिसत नसतील आपण आंधळ्यांना...
पण त्या नक्कीच असतात.
त्या कोमेजलेल्या प्रत्येक पाकळीत
सापडेल आजही..
तिच्या आठवांचा गंध..
जवळ ठेऊन बघ
उराशी जाणवेल..
तुझा नी माझा...
तो जन्मोजन्मीचा भावबंध
ओंकार
काहीश्या वाळलेल्या..
काहीश्या गंधीत आठवांत तुझ्या..
काहीश्या...निर्जीव झालेल्या...
व्यथा...अबोल होऊन थिजलेल्या...
कोणी देतो नाव..प्रेमाचं.
कोणी देतो...नाव भक्तीचं..
कोणी जपतो...जुन्या पानांत..
कोणी फेकतो...कच-यात...
माझ्या मनाचा ठाव
कधी कुणा न लागला...
जपलेला काटा उराशी
खोल काळजात लागला...
कोणीतरी बोलले की
फुलांना भावना नसतात...
दिसत नसतील आपण आंधळ्यांना...
पण त्या नक्कीच असतात.
त्या कोमेजलेल्या प्रत्येक पाकळीत
सापडेल आजही..
तिच्या आठवांचा गंध..
जवळ ठेऊन बघ
उराशी जाणवेल..
तुझा नी माझा...
तो जन्मोजन्मीचा भावबंध
ओंकार
मी कोण?
मी कोण?
ओळखलतचं नाहीत..
अगदी खरं..
प्लिज खरं बोला....
नाहीतर....
अजुन नाही ओळखलत..
विसरलात इतक्यातचं..
माझं अस्तित्व...
त्या शपथा....
नेहमीच्या....
लहानपणी….
चॉकलेटपायी..
अन मोठेपणी...
प्रेयसी पायी...
कितींदा आलो धावुन ...
तरी ओळखलं...नाही..
कमाल आहे तुमची...
आहे साथ इतकी जुनी
तुमची अन आमची...
तरी तुम्ही तुमच्या
ह्या जुन्या सवंगड्याला
ओळखलं नाही...
तुमच्या प्रत्येक वाक्यातला
तो मी"खरा"
खरोखरच तुम्हाला कधीच
उमगला नाही....
ओंकार
दगड
मी दगड
आडवाटेचा..
कण्हणे..प्राक्तन
माझे बहुदा..
नियमांचा बांधील...
मी समाजाचा..
एक कोणी येतो..
शेंदुर फासुनी जातो.
नकळत दुजा येतो.
हात जोडोनीया..
तीसरा करी
नामाचा घोष..
चौथ्याचे दोष
मी निवारेन.
मीच माझा होतो..
माझ्याशी बोलका...
उगाच गलका...
भक्तांचा..
शेंदुर फासुनी
देवत्व लाभले..
कोणी न जाणीले
माझे मन..
तोच मी दगड...
आडवाटेचा....
काळ बदलला
देव तो बनला..
मनीचा दगड मी..
दगडच राहीला
आडवाटेचा..
कण्हणे..प्राक्तन
माझे बहुदा..
नियमांचा बांधील...
मी समाजाचा..
एक कोणी येतो..
शेंदुर फासुनी जातो.
नकळत दुजा येतो.
हात जोडोनीया..
तीसरा करी
नामाचा घोष..
चौथ्याचे दोष
मी निवारेन.
मीच माझा होतो..
माझ्याशी बोलका...
उगाच गलका...
भक्तांचा..
शेंदुर फासुनी
देवत्व लाभले..
कोणी न जाणीले
माझे मन..
तोच मी दगड...
आडवाटेचा....
काळ बदलला
देव तो बनला..
मनीचा दगड मी..
दगडच राहीला
ओंकार
Subscribe to:
Posts (Atom)




