असे म्हणतात की आरसा कधी खोटं बोलत नाही
तुटतेय माझे मन आत हे त्याला कसं कळत नाही
डोळ्यांतील अश्रु आता पापण्यांचा आड दडवलेत...
वाट तुझी पाहुन आता डोळेही माझे थकलेत
____________________________________________________________________
आरशात स्वतःचाच चेहरा आताशा,
अनोळखी वाटु लागलाय
का जगतोय आणी कोणासाठी,
हा प्रश्न आता पडु लागलाय
तिच्यासाठी वा तिच्या वेड्या आठवांसाठी...
काहीच कळत नाही
जगण्याचे ध्येय माझ्या,
काही केल्या सापडत नाही
____________________________________________________________________
बनुनी बिजागर जुनाट कुरकुरतो पाऊस
लावुन पंख गरुडाचे आकाशी विहरतो पाऊस
तुला नी मला भेटवतो तो हाच पाऊस
आहे रोजचाच तरी आहे वेगळा पाऊस
____________________________________________________________________
आज कोसळे पाऊस
कुठे ढगांत कुठे डोळ्यांत
बनुनी प्रेम माझे आज पाझरे पाऊस
आहे रोजचाच तरी वाटे वेगळा पाऊस
____________________________________________________________________
आठवांनी तिच्या झाला चिंब तो पाऊस
आर्त साद बनुनी आज घुमतो पाऊस
तिच्या कानी जाऊन अलगद कुजबुजतो पाऊस....
आहे रोजचाच तरी आहे वेगळा पाऊस
____________________________________________________________________
स्वप्नांतुन सत्यात उतरताना तुझी पाऊले हळुवार वाजतात
माझ्या -हुदयाचा एक ठोका त्या नेहमीच चुकवतात
चेह-यावर आलेली बट तु अलगद बोटांनी सावरतेस...
ओठांनी काहीच बोलत नाहीस पण डोळ्यांनी घायाळ करुन जातेस
____________________________________________________________________
प्रेम म्हणजे ति समोर नसतानाही
जवळ असल्याचा भास...
प्रेम म्हणजे जणु असतो
एक सुंदर आभास
____________________________________________________________________
डोळ्यांत घेऊन स्वप्ने
जागेपणी वावरणे म्हणजे प्रेम
त्याच स्वप्नांच्या जगात
मुक्तपणे वावरणे म्हणजे प्रेम
____________________________________________________________________
प्रेम म्हणजे लुटणे नाही
प्रेम म्हणजे लुटवणे....
डोळ्यांत पाणी असतानाही
तिच्यापासुन अवचीत लपवणे
____________________________________________________________________
प्रेम म्हणजे काळजी...
प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे -हुदयाचा ठोका...
प्रेम म्हणजेच श्वास
बरसणं माझं तिच्यासाठी..
उमगत नाही ...समजत नाही...
ओघळणारे नुसतं खारं पाणी नसुन प्रेम आहे माझं
कोणालाच का कळत नाही?
प्राक्तनाचा खेळ असतोच हा निराळा
त्याचा गुढ भावार्थ शेवटच्या श्वासापर्यंत उलगडत नाही
__________________________________________________________________
शब्द मुके होतात तेंव्हा
पाऊस धिरगंभीर पणे बरसतो...
त्याचा गुढ भावार्थ कधी डोळ्यांत
कधी नभांत सापडतो..
सापडतो अर्थ शब्दांना तेंव्हा
मुक्त झ-यातुन खळखळतो....
तिच्या वेड्या आठवांत रंगुनी
अंगणातील गुलमोहोरावर बहरतो...
मुक्त होऊन कोंदणीतुन आभाळाच्या
तुझ्या मिलनासाठी तारा बनुन कोसळतो...
__________________________________________________________________
मी हसतो म्हणजे मी जगात सर्वात सुखी आहे,,
असे प्रत्येक जण समजत असतो...
माझ्या चेह-यावरचा खोटा मुखवटाच
जोतो क्षणोक्षणी पाहात असतो,,,
डोळ्यातले पाणी कधीच कोणाला का दिसत नाही..
आणी दिसावे ते कोणाला असे मलाही कधीच वाटत नाही
___________________________________________________________________
प्रयत्न करुन तरी बघ एकदा मनातले कल्लोळ विरुन जातील,,
कोणासाठी तरी ओघळणारे अश्रु देखील सुकुन जातील..
आयुष्य असेच आहे कल्लोळात हरवणारे...
मुक्त पणे हस एकदाच प्रश्नांचे गुंते देखील सुटुन जातील.
___________________________________________________________________
प्रत्येक वादळाला आता सामोरे जायला शिक...
वाहत्या वा-याला आता थोपवायचे शिक...
जीवन हे असाच खेळ आहे सापशिडीचा..
रडीचा डाव सोडुन आयुष्य बिनधास्त जगायला शिक
___________________________________________________________________
अशी भावना जी व्यक्त करुनही अव्यक्तच असते...
बोलकी असुनही मुकी असते...
सगळे मिळवुनही सारे काही गमावणे असते...
ज्याच्यापायी नकळत आपले मन फसते
बसं नातं हे असेच असते...
____________________________________________________________________
नाती सहजच जोडली जातात...
अनेकदा नकळत सहजच तोडलीही जातात
काही नाती मात्र अशी अनाहुतपणे जुळतात
की तुटताना डोळ्यात पाणी ठेऊन जातात
माझ्या कवीता विचारतील हिसाब
डोळ्यातुन आज ओघळलेल्या आसवांचा...
आज आहे उद्या नसेन मी
कधी न उमगला खेळ हा नशीबाचा....
त्या आसवांची किंमत मोजताना
तुला कदाचीत तुझी चुक उमगेल
बघ मागे वळुन फक्त एकदा सखे...
तुझ्या पाऊलांशेजारी उमटालेले माझेही पाऊल दिसेल
____________________________________________________________________
मी लिहीलेले वाचायला उद्या मी असेन नसेन कुणास ठाऊक..
निदान लिही पर्यंत तरी श्वास देतील का श्वास देवास ठाऊक
उद्या मी नसलो तरी माझ्या कवीता तुझ्याशी बोलक्या होतील...
माझ्या पाठी माझ्या आठवणी सखे तुझ्याकडे घाव घेतील
____________________________________________________________________
आता नक्की कशाला सावरु काहीच कळत नाही
बिथरलेलं मनं की पसरलेली स्वप्ने...
काहीच समजत नाही...
दोन्ही तितकीच महत्वाची
जगण्यासाठी......
____________________________________________________________________
आकाशातील ता-याचे प्राक्तन
कोसळणेच होते...
तुझ्या माझ्या मिलनाचे सारे संकेत
ठळकच होते.
पण कदाचीत माझ्या स्वप्नांचा पाया
हा वाळुचाच निघाला....
एका उसळलेल्या लाटेसरशी
माझ्या कल्पनांचा महाल कोलमडुन गेला
____________________________________________________________________
कोलमडताना त्या महालाच्या भिंती
आजही तुझ्या वाटेकडे पाहात होत्या...
सावरायला स्वतःला आजही
तुझ्या हातांना शोधत होत्या...
सारे संकेत... सारे काही
सरतेशेवटी पुसट झाले...
दुस-या लाटेच्या आघाताने
उरलेले ते भग्नावशेष पसरुन गेले
____________________________________________________________________
त्याचा अर्थ शोधता शोधता...
जन्म पुरा सरुन जातो...
आसवांना जाब पुसता पुसता....
पुन्हा तुझ्या आठवांत मी हरवुन जातो..
____________________________________________________________________
वेड्यागत वावरतोय आजही तुझ्याचसाठी....
तिळतिळ करुन आजही तुटतोय मी
केवळ तुझ्या सुखासाठी..
बेभान वा-यालाही आज मी वचनात बांधुन ठेवले...
पण तरीही डोळ्यांचे पाश तोडुन सारे..
पापण्यांवरुन दोन थेंब हलकेच ओघळले
तुझ्यासाठी माझं झुरण...
जसं वा-यावर अलगद मोरपीसाचे उडणं.
अन मला पाहाताच तुझं ते डोळ्यांची कवाडं उघडणं...
अन डोळ्यांच्या कोप-यात ते नेहमीचं निरागस लाजणं
____________________________________________________________________
तुझा एक कटाक्ष मला वेडा करुन जातो...
तुझा आवाज माझ्या कानात सतत गुंजत राहातो..
हे नक्की आहे तरी काय...
प्रेम म्हणजे ते हेच असावं बहुतेक..
नाहीतर बाकी राहीलेय तरी काय?
___________________________________________________________________
थरथरत्या ओठांनी
तु अलवार माझे नाव घेशील?
डोळ्यांवर आलेली बट
अलगद बोटांनी सावरशील?
हलकेच लाजशील.....
मनापासुन हसशील...
सांग ना? मला वेडं करायला
अजुन
काय काय करशील?
___________________________________________________________________
जगु दया जगु दया म्हणत
जो तो जगत असतो,,
दुख-या काळजात बोचरं शल्य घेऊन
जो तो फक्त कण्हत असतो..
ह्या अंधारलेल्या दुनीयेत.
फडफडता दिवा घेऊन काळजात
जोतो जिवाचा जिवलग शोधत असतो.
__________________________________________________________________
श्वास ही तुझेच.. प्रेम ही तुझेच...
सारं काही तुझेच आहे
श्वासांपायी अनं प्रेमापायी धडाडणारं
-हुदयच वेडे तुझे आहे
___________________________________________________________________
श्वास महत्वाचे की प्रेम आयुष्यात...
कोणीतरी सांगेल का मला?....
दोहोंपैकी कोणाचे मोल अधिक
कोणी समजावेल का मला?
___________________________________________________________________
पाऊले थकली... मार्गही सरला
सारे मागे पडले होते....
रस्ता एक होता आपला तरी
ध्येय भिन्न झाले होते...
अनोळखी होऊन गेलो होतो आपण
आज इथल्या गर्दीत हरवुन...
शब्दही आज अपुरे पडतायत..
आपल्या नात्याचे अनुभव त्यांत मांडुन...
___________________________________________________________________
सुकलेले अश्रु..... वाळलेले गुलाब...
तुटलेला तारा... अन जाळीच पिंपळपान
कोणीतरी विचारले ह्यात कॉमन काय...
मी बोललो "तु"
कारण ह्या सगळ्यात आधी तु होतीस...
तुझ्यापायी डोळ्यातले अश्रु आज सुकले...
तु दिलेले गुलाबाचे फुल आज वाळले....
तुझ्यापायी कोसळला तो तारा आभाळाच्या कोंदणीतुन...
अन पिंपळपान तुझ्या आठवांत आज जाळीचे झाले
धरणी माय यंदाही कोपली
आम्हा गरीबांची उभी पिकं
यंदा पावसाने झोपली...
पुन्हा नुकसान... पुन्हा कर्ज...
ह्या कर्जाच्या बोज्याखाली
जीव गुदमरायला लागलाय...
लेकरांचा भुकेला चेहरा
दिवसरात्र डोळ्यासमोर नाचायला लागलाय...
पाऊस पडेल यंदा ठिक
ह्या आशेवर मी पुन्हा कर्ज घेतलं
पण पुराच्या पाण्यासोबत
जगण्याची इच्छाच वाहुन गेली
आता फक्त झाड शोधतोय
लटकण्यासाठी...
ओंकार