अश्याच एका संध्याकाळी ...
एकांताची...वेळ...
अन समोर तु...
बोलकी असुनही ...अबोल...
बरेच काही ओठांमागे दडवत...
ती रात्र तशीच खुळी होती...
तुझ्या आठवांत ओली होती...
थोडीशी कातर.....
मुक्त उधळलेल्या चांदण्यांप्रमाणे...
आकाशाची शाल पांघरत..
कातर त्या राती ..
चमकता प्रत्येक काजवा मीच होतो...
तुझ्या माझ्या मिलनाचे..
मिलनगीत सजवत....
कोसळता तारा देखील मीच होतो.
ओंकार...
No comments:
Post a Comment