पैश्यांच्या बाजारात....स्वतःच मोल लावुन...
चेह-यावर रंग फासुन...
स्वतःची नुमाईश करायचे...निमुटपणे.सहन करायचे सगळे काही
त्याच पैश्यांसाठी....
पाच हजारासाठी बापानं विकलं...
तेंव्हापासुन...सगळं निमुटपणे सहन करत आलीय...
जगायचा प्रयत्न करत आलीय...
केवळ पोटच्या पोरीसाठी....
तिला ह्या नरकात नाही ठेवायचयं मला....
अजुन एक कळी उमलण्याआधीच
कुस्करण्यासाठी..
No comments:
Post a Comment