दुःख सहन करणे...आताशा...
माझ्याने जमणार..नाही...
खुप मुश्कीलीने समजावलेय मी माझ्या मनाला...
माझ्या मनाचे शल्य मी व्यक्त करुच शकणार नाही..
आठवांची गणीतं न सोडवलेलीच बरी..
त्यांचा काही नेम नसतो..
कधी हासु ...कधी आसु...
काहीच कळण्याचा मार्गच नसतो
स्वप्न तर माझीच हक्काची आहेत...
कारण ती फक्त माझी नी माझीच आहेत...
त्यांना स्वहःहुन जास्त जपतोय..
कारण
आता त्या स्वप्नांसाठीच का होईना मी जगतोय...हसतोय.
कायमसाठी..निजायला
फारसे कष्ठ पडणार नाहीत..
पण त्याने माझे
काहीच प्रश्न सुटणार नाहीत.
वाळुच्या भिंती....किना-यावर
भीती ....झेपावणा-या लाटांची..
आजकाल तशीच वाटतेय भिती..
पुन्हा स्वप्न पाहाण्याची.
तो ठसा...कायमच जपणार आहे ...मी
तुझ्या आठवांसोबत...
कारण तोच देतोय मला जगण्याची उमेद नवी..
सरत होती...जी श्वासांसोबत..
काही संदर्भ मुक्त..सोडलेलेच बरे...
काही रकाने....रिक्त..सोडलेलेच बरे...
म्हणजे....हवं ते लिहीता येतं...
मनातलं हवं तिथे...हवं तेंव्हा..
अजुनही तुझी आठवण दाटली..
की शब्द माझे मुके होतात..
कल्पनांचे रंग माझ्या...
अवचीत का फिके होतात
ओंकार
superrrrrrrrrrrbbbbbbbbbbbb
ReplyDelete