संवेदना हल्ली नुसत्या बधीर होतात..
भावना बोथट झालेल्या खुपत राहातात ...
काळजात खोलवर...घाव करत...
वाहाणा-या रुधीराचे मोल...
आम्हा षंढांना कधी कळायचे?
सारे पुतळ्यासारखेच....निर्ढावलेले.....
बांडगुळासारखेच...
प्रत्येक मन...
कोणाना कोणाशी जुळलेले...
त्या सा-या पायी,
स्वतःची ओळख विचारतयं कोण?
आहे किंमत ह्या जगात मुल्यांना?
तत्वांना?....
जुन्या संदर्भांना...संकल्पनांना....
दिड दमडीची किंमत नाहीय
आज...ह्या सा-यांना...
सगळे काही निमुटपणे...
सहन करत राहायचा देखील आता राग येतो...
आजकाल हे सारे बघुन....
स्वतःचाच राग येतो....
स्वतःचाच राग येतो....
ओंकार
खुपच सुंदर, कविता मनाला खरचं भावली....
ReplyDelete