तो खुळा...
कायमच खुळा राहीला..
आजन्मच त्या
श्यामनिळ्याचा शोध
घेत राहीला..
प्रत्येक पाऊलांत
तो बासरीवाला
काही औरच भासला..
अन प्रत्येक क्षणांत
भगवंत प्रत्येकालाच
आपल्यातलाच एक वाटला..
निळे अंतरीय...
आभाळाहुनही विशाल..
सुरेल बासरी..
सप्तसुरांतुन
वैषण्णता व्यक्त करणारी..
माथ्यावर मोरपिस..
वा-याशी स्पर्धा करणारे..
अन गळ्यांत
वैजयंतीच्या पांढ-या फुलांची माळ...
जणु नभांचे पुंजकेच...
निळ्या आभाळावर अलगद बसवलेले...
अगदी सामान्य वागणे..
कुठे दैवत्वाचा माज नाही..
कुठे सुदाम्याच्या सुक्या पोह्यांची..
जराशीही लाज नाही..
सगळं काही केलं..
अगदी सहजचं..
कोणाच्याही नकळत..
उध्दार केला..संहार केला..
रक्षण केले..प्रसंगी वारही केला..
अगदी सहजच..
ज्या बोटांत
दिव्य सुदर्शन धारणं केले..
त्याच बोटांच्या जादुने
अनेक गोपीकांनाही वेडं केले..
तेही अगदी सहजचं..
ओंकार
No comments:
Post a Comment