Saturday, October 22, 2011

बस ..थोडसंच जगुदे..

पावसाला मग सांगतो मी
अरे जरा बरसू दे ...!

अरे माझ्या सखेच्या मिठीत..
निदान थोडाकाळ तरी मला हरवुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..
जास्त कश्याची अपेक्षा नाही..
खरचं रे तुझ्याकडुन...
गतजन्मी दिलेल्या वचनांची पुर्तता..
निदान ह्या जन्मात तरी करुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

आजकालचा माझ्या दिवस
सुरु होतोय..
फक्त तिच्यासाठीच..तिच्याकडुन
तेंव्हा तिचं बेचैन होणं माझ्यासाठीचं
तोडसं मला अनुभवुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

मग तिही होते..थोडीशी बेचैन..
देऊ लागते साद..
अगदी खोल..मनापासुन..
त्यासादेस प्रतिसाद देण्याचे...
निदान थोडं भाग्य तरी लाभुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

ठाऊक आहे..तुही होतोस कातर..
त्या सौदामिनीच्या आठवांत...
तुझी अन तिची प्रिती..
अगदी माझ्या अन माझ्यासखीच्या
प्रितीसम बहरुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

तो होतो..तेंव्हा हळवा..
उगाच दोन टिपं गाळत बसतो..
अन मी..मात्र त्याच आसवांना..
अनाहुतपणे शब्दांत गुंफत बसतो..
अश्रु ते शब्द होताना. मला मनसोक्त बघुदे..
तु झालायस ना हळवा..
आज तुझ्याजागी..
मला मनसोक्त बरसु दे.
बस ..थोडसंच जगुदे..

ओंकार

No comments:

Post a Comment