तु नक्की
कश्यासाठी परततेयस?
सांग ना?
माझं तुझ्याविनाचं
तडफडणं बघण्यासाठी..?
की मी जगतोय ?
की मरतोय हे पाहाण्यासाठी..?
सांग ना?
काहीच का वाटत नाही तुला?
इतकी षंढ झालीस.?
का? सांगशील?
आजवर मी फक्त शोधच घेत होतो..
तुझ्या धुसर अस्पष्ठ पाऊलांचा...
तुझ्या खाणाखुणा सांगणा-या
त्या हळव्या अलवार स्वप्नांचा...
ती आज अवेळीच कातर झालेली रात
ती पाऊले दमल्याने अर्धवटच सुटलेली..
ती धुक्यात हरवलेली वाट...
ठाऊक आहे ना?
की आता तुझी चाहुलदेखील..
मनात एक वादळ उठवते...
अन सुरु होतं..एक नवंच द्वंद्व..
माझंच माझ्याशीच...
सारं काही…
कळुनही न कळलेली तु...
बोलायचीस...
तुझा अबोल शब्दांतले.
शल्यही मला समजते..
मग आज माझी किंकाळी..
का....
तुझ्या मनास हेलावुन जात नाहीय?
सांग ना....
जाऊदे ग...ठाऊक आहे...
ते बोलायचीस तेंव्हा तु माझी होतीस...
तुझ्या -हुदयात
स्पंदन बनुन घुमणा-या
श्वासांसारखीच...”अटळ”
त्या कान्हाच्या
हेलावणा-या खुणावणा-या
पाव्यासारखीच...”पवित्र”
त्या दगडांनाही
पाझर फुटायला लावणा-या
श्रावणसरीसारखीच...”निर्झर”..
तुझं असणं...
माझ्या स्वप्नांतल..
तसंच शाश्वत होतं...
तेंव्हाही... अन आत्ताही..
कारण...
स्वप्नांतली तु..अन
सत्यातली तु...
ह्यात तेवढाच फरक आहे...
“चिंता” अन “चितेत” आहे....
बस...आणखी काय बोलावे?
तुच सांग ना?
ओंकार
No comments:
Post a Comment