Wednesday, September 28, 2011

निळं वादळ..कुरुक्षेत्रातलं

एक वादळ..निळशारं..
त्याच कुरुक्षेत्री घोंघावलेलं
अन रथचक्र हाती धरुन
भगवंत
गांगेयाच्या अंगावर धावलेले..
नंदीघोषाचे पाश भले...होते..
त्या रथाच्या घोड्यांशी जोडलेले..
त्याच घोड्यांशी भगवंताने..
मनाचे नाते जोडलेले..
ओळखायचे..फरक
हातांच्या किंचीतश्या फरकाचा..
कसे चालवुन घेतील दैवी रथ
ओढणारे घोडे हात कोण्या परक्याचा..
राधेशी जोडलेलं सौख्य..
अन जन्मोजन्मांतरी जोडलेलं नावं..
त्या दोघांचेही...
रुक्मीणीचा कान्हा...
राधे-कृष्णात
आजन्मच रंगुन गेलेला...
तोच कान्हा
त्या मीरेच्या भजनांत
असाच
सर्व भान हरवुन दंग झालेला..
दोघींचाही तो...
पवित्र अश्या नात्याने
दोघींच्याही जवळ नसुनही..
मनाने त्यांचाच झालेला..
आयुष्यभरासाठी..
राजेश्वर्य त्यागुन..सर्वस्वाने त्याची..
वेडी झालेली "मीरा"..
अन
श्रीसखी बनुन अमर झालेली..
"राधा"..
दोघीही त्याच कान्हाच्या..
त्याही आयुष्यभरासाठी..

ओंकार

1 comment: