तुझ्या अंगणात
तुझ्या अंगणातील तुळशीसमोर
भर पहाटे दिवा पेटवणारी तु
अन.मी दिसताच कुंपणाबाहेर..
नकळतच..स्वतःत हरवणारी तु
तो तुळशीसमोरील मंद दिवा
तुझ्या येण्याची शाश्वती देणारा..
बेधुंद वारा..विझवण्यास त्याला
उगाचच..एवढा आतुर होणारा
प्रत्येक फेरा..तुळशीभोवतालचा
अन..त्याच सोबत सजलेलं स्वप्न
प्रत्येक क्षणांत तुझी वाटं बघण्याचं
त्या कुंपणाबाहेर..तुझ्या प्रतिक्षेत
पाहुनही मला कुंपणाबाहेर..
अंगणातच थबकलेली तु..
अन.माझी वळलेली पाऊले पाहुन
पदराआड..मनसोक्त रडलेली तु
ओंकार
No comments:
Post a Comment