Tuesday, September 27, 2011
अनाम बंध....
खुप दिवस झालेत...
तिला भेटलो नाही..
ठरवलेय आज.... की भेटायचं
मनातलं..सगळं..अगदी सगळं..
आज तिला सांगायचं
तिच्या मिठीत आजही शिरायचं
अगदी नेहमीसारखंच
तिच्या चेह-यावर ढळणा-या बटा..
बोटांनी दुर सारत...
अगदी सहजच...
तिच्या त्या बोलक्या डोळ्यांत
हरवायचं अगदी सहजच...
तिही लाजेल थोडीशी...
अगदी उगाच
तेही अगदी नेहमीसारखचं
अन मग शिरेल तीही मिठीत..
सर्व काही विसरण्यासाठी..
निदान काही क्षणांपुरते...
डोळ्यांची मंद उघडझाप करत..
मला डोळ्यांत भरुन घेणारी ती..
अन अजुनही तिच्या त्या
गही-या गुढ डोळ्यांची भाषा
समजुन घेण्याचा प्रयत्न करणारा मी..
त्याचवेळी
एका नेत्रकटाक्षाने
घायाळ करुन गेलेली तीची..
तिच अदा...
अगदी नेहमीसारखीच..
अन ठाऊक असुनही सगळं..
तिला त्रास देणारा मी...
मुद्दाम विचारत तिला...
की
किती प्रेम करतेस माझ्यावर?
त्या प्रश्नाने बावरुन...
लटकेच रुसणारी ती..
अन मग
तिला मनवण्याचा प्रयत्न करणारा मी..
तिचा रागही
तसाच तिच्यासारखाच गोड..
क्षणार्धात हरवुन जाणारा...
मोहक..
असचं तिचं नी माझं नातं..
जन्मोजन्मीचं..
साथही तशीच..
आयुष्यभराची..
अन जुळलेला एक अनाम बंध..
तिने
माझ्यासाठी केसांत माळलेल्या
मोग-याच्या गज-यासम दरवळणारा..
आजन्म............
ओंकार
Subscribe to:
Post Comments (Atom)
apratim....Chan jamali aahe..
ReplyDeletechan jamaliaahe
ReplyDelete