Tuesday, September 20, 2011
खरचं काही सुचत नाही..
खरचं काही सुचत नाही..
काय बोलावं कसं बोलावं..
काहीच का कळत नाही..
खरचं काही सुचत नाही..
शब्द रुसतात अनेकदा..
एकटा जेंव्हा मी असतो..
माझ्या नभीचा चंद्रमा खुळा
क्षणार्धात नभांआड दडतो
त्या चंद्राला कसं मनवावं
मला काही कळत नाही
खरचं काही सुचत नाही..
ती येण्याआधी कायमच..
मी मिलनगीत सजवतो
ती येताच समोर माझ्या
शब्दांना ओठांआड लपवतो
अबोल शब्दांआडचे प्रेम माझे
तिला कधीच का कळत नाही
खरचं काही सुचत नाही..
ती जोवर असते समोर.
मनास समुद्राची शांतता असते...
त्या शांततेस चिरत जाणारी..
वादळाची एक किनार असते..
त्या वादळाचा मनातील कल्लोळ
तिला न सांगता का कळत नाही?
खरचं काही सुचत नाही..
ती जाते थोडासा मी बेचैन होतो..
आमच्या भेटीस नकळत शब्दांत मी गुंफतो
पाऊले पाठमोरी हळुहळु नजरेआड जातात
मीही फिरतो पाठीमागे...खिन्न मनाने
नजरेत तिचे पाठमोरं रुप साठवत..
नजरेतील आतुरता..तीला का जाणवत नाही.?
खरचं काही सुचत नाही..
आजकाला काहीच सुचत नाही..
ओंकार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment