त्या झिजलेल्या रडगाण्यासम
झिजलेला मी...श्वास थांबले तरी..
मन स्थिरावण्याची वाट बघत..
नव्याने उजाडणा-या पहाटेचे
स्वप्न बघत.. उभा जन्म सरुन गेला...
ओळख शोधता शोधता..स्वतःची
तरीही..अजुनही स्वतःस
न ओळखु शकलेला षंढ मी.
अपेक्षाभंगाचं ओझं..आजकाल
मी कटाक्षाने टाळतो..
भर पावसात..आकंठ भिजून..
मनसोक्त आसवे गाळतो..
जगतो तसाच...गर्दीत हरवुन...
मरेनही तसाच...गर्दीत हरवुन..
निर्जीव चेह-यांच्या ह्या नाटकी दुनीयेत..
असाच..चेह-यावर रंग फासुन..
स्वतःसाठी..दुनीयेसाठी...
त्या फसव्या चेह-यांच्या...
फसव्याच अश्रुंचे व्याज
आता खरचं डोक्यावर नकोय..
माझ्यावर उपकार केल्याची
भावना..कोणाच्याही मनात नकोय...
मला आता काही नकोय...
कोणीही नकोय...
हवीय ती..शांतता...कदाचित चिरशांतता...
निदान काही क्षणांसाठीची...
मग सुरु करायचाय
तो पुन्हा एक प्रवास..
तोही एकट्यानेच...
अगदी शांत होऊन सर्वाथाने
माझी ही कविता..
कदाचित..आजही पुन्हा बोचेल..
उगाच काहीही लिहीतो हा..
असं सहजचं तुम्हाला वाटेल..
आभाळाच्या डोक्यावरचं
ओझं आता मला उतरवायचयं..
त्यासाठी फक्त एकदा
एक नवं ठिगळ शिवायचयं..
आभाळ दाटेल पुन्हा त्याच जुन्या आर्ततेने..
मिलनाच्या..विरहाच्या..जुन्या आठवणींनी..
जगलो तर जगुद्या,
मेलोच तर मरुदया
आभाळ आत्ताच शिवुन झालयं माझं
थोडं..अगदी थोडं पाणी तरी साठुदया..
त्याच पाण्यात मला आकंठ भिजायचयं
नव्या भुमीकेआधी
एकदा..ह्या जुन्या पात्रात
मला एक दिवस मनसोक्त जगायचयं
ओंकार
No comments:
Post a Comment