Friday, September 23, 2011

थोबाड-पुस्तक महीमा...

त्याच थोबाड-पुस्तकाने
रोज सकाळी उठवावे..
नक्की चाल्लेय काय?
माझ्या मनात
ते त्याच खुळ्याने विचारावे..
माझ्या मनातले गुपीत
मग सा-या दुनीयेस सांगावे..
कस्टमाईज करुन मग मी ही
ते उगाच सगळ्यांपासुन लपवावे..
हे थोबाड-पुस्तक प्रकरण काही साधं नाही..
कधी कळते काही काही..
अपडेट झालं की वळतच नाही..
प्रत्येकाच्या भिंतीवर
दुनीयाभरचा बाजार असतो..
कुठे चित्र कुठे विडीयो..
सगळा मुक्त संचार असतो..
"आवडले हो" बोलायला
इथे परवानगी असते...
नावडतीच्या चेह-यावरच
रेषाही इथे पुसते..
इथे कविता भेटतात..मित्रही..
इथे नाती जुळतात...शत्रुही..
सगळ्यांच्या नावे
एक खुला दरबार असतो..
प्रोफाईल पिक्चरच्या आड
दडलेला खराखुरा चेहरा..
मात्र प्रत्येकाचाच खास असतो...
त्यानेच उठवावं..त्यानेच भांडावं..
त्यानेच मनवावं..कुशीत घेऊन झोपावं.
थोबाड पुस्तकाचा वापर
आयुष्याचा भाग असतो..
थोबाड-पुस्तकाच्या नावाने
अधुन मधुन दिवाळी
कधी शिमगा असतो.

ओंकार
{थोबाड-पुस्तक = FACEBOOK}
IDEA... (तुषार जोषी , नागपुर)

No comments:

Post a Comment