Saturday, September 24, 2011

‎"कान्हा"...

तोच तो कान्हा...
राधेच्या
वैजयंती माळेत शोभणारा..
मीरेच्या
आर्त भजनांत डोलणारा..
पांचालीच्या
फाटक्या पदराचं पांग फेडणारा..
रुक्मीणीचे
सौभाग्य बनुन वावरणारा..
कान्हा..
तोच कान्हा...
कुरुक्षेत्रात
पांचजन्य फुंकुन लढणारा..
अगदी अल्लड..लाडीक..
प्रत्येक गोपीकेच्या
गळ्यातील ताईत..
प्रत्येक गोपाळास
जवळचा मित्र भासणारा
कान्हा...
सुदाम्याचे पोहे आवडीने खाणारा..
राधेयाशी ..
आजन्म मैत्री करणारा...
निळ्या उत्तरीयाआडुन..
कायमच शिकवत राहीला..
प्रत्येकासच...
मैत्र...प्रेम...बंधुत्व...शत्रुत्व..
सगळं काही...अगदी सहजच..
भगवंत असुनही...
अगदी सामान्य माणसासारखं..
सर्व काही सहन करत..
अगदी सहजच...
सर्व दुःख
त्याच सुरेल बासरीच्या नादात गुंफत...
तेही अगदी सहजच...

ओंकार

No comments:

Post a Comment