Monday, September 5, 2011

मी..खुळा..



उरलेले अश्रु ओंजळीत बांधुन..
मी..अवचीत एकांतात हसणारा..
अन तुझ्या आठवांत रमुन.
मी..खुळा..कविता करणारा

थोडासा अबोल..थोडा बोलका..
प्रसंगी..निःशब्द करणारा..
थोडक्याच वेळी..मनातल्या भावनांना.
कोणासमोर रितं करणारा...

कोणास मी वाटतो निर्दयी ..
कोणास वाटे मी मग्रुर..
नसते सोबतीस कोणीही जेंव्हा.
येतो..मनात भावनांना पुर

निःशंक पण जगतोय मी..
आसवांनाही सांभाळतोय मी..
जन्म नव्याने घेता घेता..
जुन्या जखमाही लपवतोय मी..

जुन्या जखमा..वाळुनही जातील..
नयनांच्या वातीही..विझुन जातील..
स्वप्न डोळ्यांत उतरता उतरता..
श्वासच...सारे असमर्थ होतील..

तरीही पुन्हा दिसेन मी..
नभांमध्येही भासेन मी..
शोध एकदा घे माझा माझ्याच शब्दांत
त्या कवितांत नक्कीच बोलेन मी..

दिसेन तुला..मनसोक्त हसताना..
तर कधी.एकांतात..उर भरुन रडताना..
अवचित तुझ्या आठवांत हरवताना..
अन सापडली तु..की तुझ्यात मिसळताना.

मला शोधण्यासाठी..
फक्त शोधक नजर हवी
डोक्यांतले वादळ समजण्यासाठी
फक्त मनाची तयारी हवी

ओंकार

2 comments:

  1. apratim mitra... kavita vachun man aagdi katar houn gele... simple awesome..keep it up

    ReplyDelete
  2. kavita farach sundar aahet tumchya...
    tumcha profile kuthe nahi sapadla blog var.. tumchya baddal mahit karun ghyayla nakki aavdel..

    ReplyDelete