Tuesday, January 17, 2012

तिमीरसुक्त


दिशा कोंदट कोंदट...
नभ साचले कित्तेक...
नाही किरणाची आशा..
चिर उभी काळजात...

एक पारवा तो खुळा..
आज गातो पारावर..
धरे साल ती काळाची..
पुन्हा जुन्या घावावर.

सल खोल ती मनाची....
काही चुकार क्षणांची..
दावी भिती तु मनाला..
का रे उगा...अंधाराची

सांज ढळाया लागली...
रात खुलुनी सजली
न जाणे कोणास कशी..
आज चाहुल तुझी लागली.

नवे तिमीराचे सुक्त...
सारे प्रकाशाचे भक्त...
खोल गोठले ते रक्त.?
लढं श्वासांशी तु फक्त

ओंकार....

No comments:

Post a Comment