चुकभुल दयावी ...
ओंकार
संभवामी युगे युगे
केवळ...काहुर..मनात..
विचारांच...प्रश्नांच...कश्यासा
अन मुख्य म्हणजे कोणासाठी..
सारेच रक्ताचेच भाऊबंध...
अगदी माझ्यासारखेच रक्तामांसाचे..
ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो...
वाढलो..शिकलो...तेच ...तेच सर्व..
हा धर्म..की अधर्म..का? कळतच नाहीय..
धर्म अधर्माचा जालीम बुरखा.
चेह-यावर लावुन..
बेमालुम गर्दीत मिसळणारा..
मी युगा-युगांचा..युगंधर..
क्षणार्धात..कफल्लक झालेला...ह्या सा-याने...
काहीच कळत नाही..
जो लढतोय..तोच मी..
अन ज्याच्याशी लढतोय..लढणार आहे..
तोही माझाच मी..
सारे माझेच... अन सा-यांत मी..
सुन्न झालेलं डोकं.. दुमदुमणारी रणदुदंभी..
गर्जणारे शंख..अन सोबतच
नजरेस धुमील करणारा तो धुरळा..
रथचक्रांमुळे... उमटलेल्या रेषांसमवेतच...
अधोरेखीत झालेले..काही प्रश्न..
युध्द कश्यासाठी..? काय सिध्द करण्यासाठी..?
श्रेष्ठत्व? की.....
कश्याचेच उत्तर नाही....
पाठी हा पार्थ..अन समोर राधेय..
दोन्ही माझेच...प्राणांहुनही प्रिय..
एक ब्राह्मणवेशात
रानोवनी भटकलेला...
एक सुतपुत्र म्हणुन
आजन्म हिणवले गेलेला...
मी ही तसाच नाही का?
गोपाळ..गोकुळातला...
हताशपणे..हा अधर्मरुपी..अंधारात
अनाहुत हरवत चाललेला.. सुर्य..
सुन्न झालेल्या डोक्यांतुन..
ऐकु आलेले उत्तर….
"यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत,
अभ्युथानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् |
परित्राणाय साधुनाम
विनाशाय च: दुष्कृताम,
धर्मं संस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे
संभवामी युगे युगे
ओंकार
"ब्राम्हण" चुकीचा लिहिला आहे. असे न लिहिता "ब्राह्मण" असे लिहावे.
ReplyDeleteलेख आवडला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा