Thursday, February 1, 2007

अंधःकार


अंधःकारअंधारच्या साम्राज्याला जिथे आहे वाव
त्या अश्या मनाच्या कोनाड्यात वसला आहे माझा गाव
जिथे माणुस माणसाला विचारत नाही
कुणी कुणाच काही लागत नाही
अश्या ह्या अंधारलेल्या दाट ढगांच्या आड वसला आहे माझा गाव
जिथल्या प्रत्येक गोष्ठीवर आहे फक्त अंधारचेच नाव
जिथे दिवस उगवायचे घेत नाही नाव्
अश्या अंधःकारमय क्षितीजामागे वसला आहे माझा गाव
अंधःकारात ह्या अश्या आज मिटून जाईल माझे नाव
उद्याचा त्या अंधःकारमय रात्रीत कोणास ठाऊक माझा ठाव
जिथे नाती नाहीत प्रेम नाही नाही कोणता भाव
त्या अनाहुतपणे पडणारया अंधारामध्ये हरवुन जाईल माझा गाव

No comments:

Post a Comment