चक्रव्युह अंधाराचा
आज अचानक का अडकलो,चक्रव्युहात ह्या मनाच्या,जणु बांधलो गेलो,
आज मी बाहुपाशात अंधाराच्या,
अंधार हा मनातला नात्यातला,
डोळ्यांमागील ढ्गांतील,
हो तोच हा अंधार,
अंधारलेल्या भावनांचा अंगार.....
शिरलो आत अभिमन्युसारखा
विळखा तो तयाचानाही कळला मला,तो होता एक डाव त्याचा मनामध्ये लढता लढता,
घेतला ताबा माझ्या मनाचा,
अंधार दाटुन येताच सर्व सर्व काही विसरलो......
मनातील अंधाराच्या जाळ्यामध्ये फसलो
अंधाराने मला आज असे काही वेढले,
दाटुन आले मन माझे,आठवणींमध्ये गुंतले,
कधीही न हरणारे माझे मन, आज मात्र तुझ्यापुढे फक्त तुझ्यापुढे हरले......
No comments:
Post a Comment