Friday, February 2, 2007

मि आणी अंधार.


मि आणी अंधार.

त्या दिवशी घरातुना निघालो
पाहायला अंधार

विचारून घेणार होतो गोष्ठी
सुःख दुखाःच्या दोनचार,
फिरफिर फिरलो पण
नाही मिळाला अंधार.

नाराज होउन शेवटी मि एका घरापाशी आलो,
कंटाळलो होतो म्हणुन तिथे दोन क्षण थांबलो.

तेवढयात नजाणो कुठून तो बाहेर आला,
पाठी मागे येऊन माझ्या दोन् क्षण थांबला.

मी म्हणालो अरे मित्रा माझी कसली भिती?
रात्रीच्या राज्याचा राजा तु घाबरतोस् किती?

तो म्हणाला मला घाबरवेल अशी जगात एकही गोष्ठ नाही
तु जाशील घाबरून म्हणून मी बाहेर आलो नाही

मी विचारले त्याला रात्री पडतोस बाहेर मग
दिवसा असतोस कुठे ?

तो म्हणाला रात्री बाहेर असतो
म्हणुन दिवसा असतो एथेच

अरे मला तुम्ही घाबरतात
तुम्ही मला काळा म्हणता

हो आहे मी काळा
अरे पण मी रंगाने काळा आहे ह्यात माझा काय दोष

अरे मी काळा आहे म्हणूनच तर माझा भाऊ प्रकाश गोरा आहे तुम्हाला रात्रीला झोप आहे
आणी मी आहे म्हणुन
तर तुम्ही आहात
मि असतो असतो तुमच्याच मद्ये
काळ्या कभिन्न ढगांच्या आड
अंधारलेल्या घरांच्या भिंती आड
त्या गावबहेरच्या डोंगराच्या आड
तुझ्यात त्याच्यात
सर्व आसमंतात्
प्रत्येक् दिशांत आणी

जसा आला नकळतच तसा निघुनही गेला अनाहूतपणे...............

ओंकार

No comments:

Post a Comment