Wednesday, February 7, 2007

असाही अंधार


जिथे आयुष्याचा अर्थ संपला,
त्या जिवनाच्या वळणावर उभा आहे बघ मी,


त्या काळोखाच्या आडोश्याला जरा शोध मला
बघ नक्की मिळेन मी,


असेन असाच शांत
अंधारलेल्या रात्रीसारखा,

दिवस उजाडण्याची वाट पाहत,
असेन असाच कासविस तुझ्या आठवणींनी
जसा होतो आज भेटल्यावर,


बघ फक्त एकदा
मागे माझा आवाज आला तर,

बघ असेनही कदाचित मागे उभा,
जन्मोजन्मी तुझीच वाट पाहत,


अरे तुला काय वाटते
जाईन का मी असा सोडून,

अनाहुत पणे अंधारामद्ये????


नाही ग वेडे,

अपयशाला घाबरणारयांपैकी मी नाही,

आयुष्यात आली जरी माझ्या संकटे काही,

नाही दाखवणार पाठ सखे,


आहे मनाच्या पंखात बळ मैत्रीचे,


आकाशामद्ये चमकणारया चंद्राप्रमाणे नसेनही कदाचित,
पण काळोख्या रात्रीत चमकणारया काजव्याप्रमाणे नक्कीच आहे ना गं मी?

अग अंधारलेल्या ह्या जगात राहीनही मी असाच शांत,

पण चालेल का तुला ते?


लागतील काही जन्म उलटतील काही जन्म,
जाईनही कदाचित मी दुर ह्या जगातून,


पण माझे हे गित देत राहील तुला साथ काळोखामद्ये,
अग वेडे तेंव्हा कधी जर माझी आठवण आली,

तर काळ्याकभिन्न अश्या आकाशातील
तारयांमध्ये पहा



सगळीकडे तुला मीच दिसेन


!
मीच दिसेन!! मीच दिसेन!!!

No comments:

Post a Comment