Tuesday, February 27, 2007

ठरवलं ना एकदा





ठरवलं ना एकदा

मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं...

ओंकार

कवितेच नाव माहीत नाही!


प्राजक्त झेलावा हलकेच ओंजळीत,
असेच बोलावे तु माझ्याशी,

जाईवर उमलावे फुल आणी,

कळु नये वेलीलाही असेच तु सोसावे माझ्यासाठी


सागराच्या लाटेप्रमाणे किनारयावर येऊन परत जावे,

मात्र परत परत यावे मिलनासाठी,

येवढे सारे मागतो आहे खरे,

पण् दुख तुझे जन्मभर सोशीन ग प्रिये फक्त तुझ्या साठीच.........

Sunday, February 25, 2007

सगळे संपण्याआधी...........






सगळे संपण्याआधी...........
होय तोच मी कवी,
होय अगदी बरोबर ओळखलतं मला,
जो कधी काव्य करुन तुला हसवायचो,
मनातल्या भावना माझ्या व्यक्त करुन तुमच्या पर्यंत पोहोचवायचो.............

अचानक एके दिवशी,
तु माझ्या आयुष्यात आलीस आणी,
मग थोडाफार सुखी झालो,
बाकी सर्व विसरुन प्रेम गिते करु लागलो............

तुझ्या प्रत्येक अदांचा मि विचार करत होतो,
तिच्या आठवणी घेऊन सोबत
रात्र रात्र जागत होतो..............

आयुष्य सुरळीत चालू असताना,
न जाणो अचानक काय झाले..........
एका झटक्यात,
सारे जिवन उध्वस्थ झाले.......
एकांतात रमणारे मन माझे,
मात्र तुझ्या विरहाने मात्र व्यतिथ झाले.......

व माझे नक्की काय चुकले ह्याचाच विचार करू लागले,

तु माझी साथ सोडलीस,
माझी काहीही चुक नसताना....
शब्दच काय ते साथ् देत् होते,
बाजू माझी मांडताना .......

कधी नाही तो मी तेंव्हा रडरड रडलो ,
तुझ्या आठवणी विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागलो ......

पण ,
तुझ्या त्या आठवणी जात नव्हत्या आयुष्यातुन माझ्या....
मलाही त्या सुखाने जगु देत नव्हत्या ,
हरलो जरी मी प्रेमात तुझ्या,
तरी ,
जिवनात मला जिंकायचे होते.....

सांगायचे होते हे शेवटचे काव्य तुला
म्हाणुन तर लिहीले आहे,
हे पत्र फक्त प्रिये तुला फक्त तुलाच गं.........

हे पत्र वाचुन होई पर्यंत,
कदाचित,
मी तुझ्या आयुष्यात नसेन.....
कदाचीत,
मी तुझ्यापासुन फार दुर गेलेलो असेन,
घाबरू नकोस फक्त एकदा तुझ्या ह्रुदयात वाकून बघ ,
कुठेतरी कोपरयात अजुनही,
मीच मी असेन..............

आणी हो ,
जमलेच तर मला माफ कर........
पहिल्यांदा मी एक निर्णय घेतलाय,
तोही तुला न सांगता,
कुणालाही न विचारता






माझं आयुष्यं संपवण्याचा..............................







..............

Wednesday, February 21, 2007

एकांत




एकांत तुला नि मला भेटवणारा,
भेटल्यावर हवाहवासा वाटणारा,
कधीकधी हसवणारा कधीकधी रडवणारा,
सुख दुखात नेहमी साथ देणारा,
मनातील भाव नकळतच जाणणारा,
वेदना विसरायला लावणारा ,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......

न बोलता सर्व काही सांगणारा,
न सांगता सर्व काही समजावणारा,
जिवनातील कमतरता दाखवणारा,
आठवणी अनाहुतपणे जागवणारा,
त्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळवणारा
,एकांत हा तुला नि मला आवडणारा.......

कधी प्रेम तर कधी द्वेष दाखवणारा,
कधी प्रेम तर कधी द्वेष दाखवणारा,
असाच हा एकांत तुला नी मला भावणारा,
अंधारलेल्या रात्री तारे मोजायला लावणारा,
रात्ररात्रभर तुझा विचार करायला लावणारा,
चंद्राच्या साक्षीने सर्व विसरायला लावणारा,
असाच हा एकांत स्वतःबद्दल काही सांगणारा,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......

चक्रव्युह अंधाराचा


आज अचानक का अडकलो,
चक्रव्युहात ह्या मनाच्या,

जणु बांधलो गेलो,
आज मी बाहुपाशात अंधाराच्या,


अंधार हा मनातला नात्यातला,

डोळ्यांमागील ढ्गांतील,


हो तोच हा अंधार,

अंधारलेल्या भावनांचा अंगार.....


शिरलो आत अभिमन्युसारखा

विळखा तो तयाचानाही कळला मला,


तो होता एक डाव त्याचा मनामध्ये लढता लढता,
घेतला ताबा माझ्या मनाचा,


अंधार दाटुन येताच सर्व सर्व काही विसरलो......

मनातील अंधाराच्या जाळ्यामध्ये फसलो


अंधाराने मला आज असे काही वेढले,

दाटुन आले मन माझे,


आठवणींमध्ये गुंतले,
कधीही न हरणारे माझे मन,
आज मात्र तुझ्यापुढे फक्त तुझ्यापुढे हरले......

Monday, February 19, 2007

मीही कविता केली असती


मीही कविता केली असती
पण करता येत नाही भावना त्यातुन व्यक्त केल्या असत्या
पण ऐनवेळी शब्दच सुचत नाहीत.
मीही काहीतरी लिहीले असतेजे लोंकांना पटले असते

त्यांनीही कधीतरी बोलता बोलता माझीही आठवण काढली असती
पण काहीतरी लिहीण्यासाठी वेळच मिळत नाही
मी कविता केली असती तुम्हाला वाचुन दाखवली असती
ति कविता वाचता वाचता शब्दरुपाने तुमच्या मनातही डोकावलो असतो
पण काय करणार तुमच्या मनात डोकावण्याचे सौभाग्य आम्हाला लाभत नाही

मिही तुझ्यावर काही कविता लिहीली असती
तुला एकांतात ति सांगितली असती
तुझ्या चेहरया वर दोन क्षण नकळत हास्य उमटले असते
पण ते हास्य पाहाणे कधीही मला जमले नाही

ठिक आहे मी कुणी कवी वेगेरे नाही
भावनांच्या आकाशात उडायला मला अजुन जमत नाही
काव्यातुन आपल्या भावना व्यक्त करायला मला अजुन येत नाही
शांतते मध्ये कवींसारखे मन माझे अजुन रमत नाही
तु जवळ नसलीस तरी तु सोबत असल्याच्या भास मला होत नाही
वाळवंटामधील म्रूगजळ मात्र मला अजुन दिसत नाही
कारण मनाचा वेध घेणारे काव्य मात्र मला अजुन जमत नाही

Thursday, February 15, 2007

अगं ए दिवाने



अगं ए दिवाने
तुझा दिवाना बनवलस गं मला

प्रेम काय असतं हे
आज शिकवलस ग मला

आत्तापर्यंत करत होतो मी
फक्त स्वतःचा विचार

तुझ्या आठवणींनी आज मात्र
मी होत आहे बेजार

आत्त पर्यंत होतो मी
एका चौकटीत गुंतलेलो

बाहेरच्या जगातील
सारी सुखेः मी हुकलेलो

तु मात्र आता मला
असे काही सावरलसं

जिवनाचे सारे सार मला
तु समजावलसं

तु जेंव्हा त्या लाजरया नजरेने
अधुनमधुन माझ्याकडे पाहातेस

जणु काहीतरी त्यातुन
जादु काही करतेस

तुझा आणी फक्त तुझाच
विचार आज् मी करतोय

तुझी आठवण काढत
मीही कविता लिहीतोय

काय करायचे हे कळतच नाही
काय काय बोलायचं हे सुचतच नाही

आज सांगायचे तुला हे रोज सकाळी ठरवतो
तु समोर आल्यावर मात्र सारे काही विसरतो

त्यावेळी नजरेत तुला भरभरून साठवतो
तुझी आठवण आल्यावर तुझा चेहरा आठवतो

Friday, February 9, 2007

नवे पंख





नवे पंख नवा ॠतु
नव्या ॠतुंचा बहर नवा
नव्या स्वप्नांनी उडण्यासाठी
नव्या स्वप्नांचा आभाळ हवा
नवी स्वप्ने वाट नवी
सर्व काही हवे नवे नवे
मिळो तुला जे तुला हवे हवे

Wednesday, February 7, 2007

असाही अंधार


जिथे आयुष्याचा अर्थ संपला,
त्या जिवनाच्या वळणावर उभा आहे बघ मी,


त्या काळोखाच्या आडोश्याला जरा शोध मला
बघ नक्की मिळेन मी,


असेन असाच शांत
अंधारलेल्या रात्रीसारखा,

दिवस उजाडण्याची वाट पाहत,
असेन असाच कासविस तुझ्या आठवणींनी
जसा होतो आज भेटल्यावर,


बघ फक्त एकदा
मागे माझा आवाज आला तर,

बघ असेनही कदाचित मागे उभा,
जन्मोजन्मी तुझीच वाट पाहत,


अरे तुला काय वाटते
जाईन का मी असा सोडून,

अनाहुत पणे अंधारामद्ये????


नाही ग वेडे,

अपयशाला घाबरणारयांपैकी मी नाही,

आयुष्यात आली जरी माझ्या संकटे काही,

नाही दाखवणार पाठ सखे,


आहे मनाच्या पंखात बळ मैत्रीचे,


आकाशामद्ये चमकणारया चंद्राप्रमाणे नसेनही कदाचित,
पण काळोख्या रात्रीत चमकणारया काजव्याप्रमाणे नक्कीच आहे ना गं मी?

अग अंधारलेल्या ह्या जगात राहीनही मी असाच शांत,

पण चालेल का तुला ते?


लागतील काही जन्म उलटतील काही जन्म,
जाईनही कदाचित मी दुर ह्या जगातून,


पण माझे हे गित देत राहील तुला साथ काळोखामद्ये,
अग वेडे तेंव्हा कधी जर माझी आठवण आली,

तर काळ्याकभिन्न अश्या आकाशातील
तारयांमध्ये पहा



सगळीकडे तुला मीच दिसेन


!
मीच दिसेन!! मीच दिसेन!!!

Friday, February 2, 2007

मि आणी अंधार.


मि आणी अंधार.

त्या दिवशी घरातुना निघालो
पाहायला अंधार

विचारून घेणार होतो गोष्ठी
सुःख दुखाःच्या दोनचार,
फिरफिर फिरलो पण
नाही मिळाला अंधार.

नाराज होउन शेवटी मि एका घरापाशी आलो,
कंटाळलो होतो म्हणुन तिथे दोन क्षण थांबलो.

तेवढयात नजाणो कुठून तो बाहेर आला,
पाठी मागे येऊन माझ्या दोन् क्षण थांबला.

मी म्हणालो अरे मित्रा माझी कसली भिती?
रात्रीच्या राज्याचा राजा तु घाबरतोस् किती?

तो म्हणाला मला घाबरवेल अशी जगात एकही गोष्ठ नाही
तु जाशील घाबरून म्हणून मी बाहेर आलो नाही

मी विचारले त्याला रात्री पडतोस बाहेर मग
दिवसा असतोस कुठे ?

तो म्हणाला रात्री बाहेर असतो
म्हणुन दिवसा असतो एथेच

अरे मला तुम्ही घाबरतात
तुम्ही मला काळा म्हणता

हो आहे मी काळा
अरे पण मी रंगाने काळा आहे ह्यात माझा काय दोष

अरे मी काळा आहे म्हणूनच तर माझा भाऊ प्रकाश गोरा आहे तुम्हाला रात्रीला झोप आहे
आणी मी आहे म्हणुन
तर तुम्ही आहात
मि असतो असतो तुमच्याच मद्ये
काळ्या कभिन्न ढगांच्या आड
अंधारलेल्या घरांच्या भिंती आड
त्या गावबहेरच्या डोंगराच्या आड
तुझ्यात त्याच्यात
सर्व आसमंतात्
प्रत्येक् दिशांत आणी

जसा आला नकळतच तसा निघुनही गेला अनाहूतपणे...............

ओंकार

Thursday, February 1, 2007

अंधःकार


अंधःकारअंधारच्या साम्राज्याला जिथे आहे वाव
त्या अश्या मनाच्या कोनाड्यात वसला आहे माझा गाव
जिथे माणुस माणसाला विचारत नाही
कुणी कुणाच काही लागत नाही
अश्या ह्या अंधारलेल्या दाट ढगांच्या आड वसला आहे माझा गाव
जिथल्या प्रत्येक गोष्ठीवर आहे फक्त अंधारचेच नाव
जिथे दिवस उगवायचे घेत नाही नाव्
अश्या अंधःकारमय क्षितीजामागे वसला आहे माझा गाव
अंधःकारात ह्या अश्या आज मिटून जाईल माझे नाव
उद्याचा त्या अंधःकारमय रात्रीत कोणास ठाऊक माझा ठाव
जिथे नाती नाहीत प्रेम नाही नाही कोणता भाव
त्या अनाहुतपणे पडणारया अंधारामध्ये हरवुन जाईल माझा गाव