Friday, October 1, 2010

अस्पष्ठ..... पुसट........

इतके दिवस झाले,
तुझ्याशी बोललो नाही
काय काय चालु आहे मनात माझ्या...
कोणालाच सांगीतले नाही.....
आजकाल कोणाशीही....
मनापासुन बोलणे होत नाही
किंबहुना मीच करत नाही
पण का कोणास जाणे
अनामीक हुरहुर मात्र कायम मनात राहाते..

पुन्हा
अचानक कोणाशीतरी,
सुर जुळु लागतील.....
शब्द जवळ येऊन दोन मनातले,
पुन्हा कवीता बनु लागतील
मन कोणासाठीतरी खुळं होईल.....
सारं काही विसरुन जाऊन,
पुन्हा एकदा पिसं होईल.....
पण आता ह्यातलं काहीच नको.....
रात्र रात्र जागुन स्वप्न रंगवणं नको.......
मी बरा.... माझी स्वप्नं बरी....
माझी एकट्याची पाऊलवाट बरी....
बाकी कोणीच नको.... काहीच नको.....

सारी सुरावट मीच मोडुन टाकलीय.....
नात्यांची घडी मीच विस्कटुन टाकलीय.....
पुन्हा बंध नको.... बंधने नको......
डोळ्यांत मिलनाची स्वप्नेही नकोत....
तु जाताना माझ्या वाटेवर जे निखारे पसरलेस.. 
तेच वेचत चाललोय...... त्याच वरुन.....
फक्त एका वेड्या आशेवर.... 
की कधीतरी माझ्या डोळ्यांतील,
त्या स्वप्नांची सप्तरंगी राख अश्रुंत भिजुन सरुन जाईल 
अन सोबत असतील ते फक्त धडधडणारे श्वास......
पण ते तरी माझे असतील? कोणास ठाऊक?

आपल्या मिलनाच्या सगळ्या खाणाखुणा,
आता पुसट होत चाल्यात.....
अश्याच एखाद्या अंधारलेल्या वळणावर,
मला हरवुन जायचेय...
कोणाच्याही नकळत....कोणाच्याही......
मग आठवणींत उरेल तो माझा चेहरा तोही 

अस्पष्ठ..... पुसट........

ओंकार

No comments:

Post a Comment