Tuesday, January 25, 2011

मनातली "ती"....

प्रत्येकाच्या मनातली "ती"..
कधीतरी....बोलकी झालीच होती...
थोडी लाजरी होती...थोडी बुजरी होती...
थोडीशी अल्लड थोडी निरागस होती...
माझ्याही मनातली "ती"
अगदी अशीच होती...
कधी...मुक्त कोसळायची...
श्रावणातल्या...निर्झर झ-यासारखी...
कधी...रुक्ष वाळवंटासारखी भासायची...
कधी बोलकं करुन जायची सा-यांना..
कधी...निषब्द करुन जायची....
प्रत्येकाच्या मनातली "ती"
एक वेगळाच आनंद देऊन जायची....
कधी...घेऊन यायची..सोंग..छंदाचे..
कधी मुक्तछंदात बहरायची....
तीच मनातली "ती".
पांढ-या कागदांवर उतरली होती..
कोणी म्हणे "भावना"...
कोणी म्हणे "कल्पना"...
प्रत्येकाला "ती" 
त्याची हक्काची वाटायची...
प्रत्येकाच्या डोळ्यातुन "ती" 
त्या अबोल रात्री...ओघळायची...
माझ्याही मनातली "ती"....
मला....क्षितीजापार..घेऊन जायची...

ओंकार
(Spl. Credits...to Santosh Kudtarkar)

2 comments:

  1. 2007chyaa "ek prashna vichaarla tar" paasunchya sarv kavita tipun thevalyaat.Shabd naahit maazyaakade! Kadhi hi comment Vaachalich tar tyaache saarthak zaalyaasaarkhe hoil,shevati tumhi kunaakunaala lakshat thevnaar! Kavitevar bolnyachya adhikar naahi malaa.Asech rangavat jaa jagaalaa!!!

    ReplyDelete