Tuesday, January 4, 2011

सागरकिनारा

शिडाला किनारा सहज गवसला...
तर वादळाची किंमत उरेल काय?
थोड....रोखुदे श्वास....लाटांनाही..
नाहीतर सहज धडकुन किना-यांवर....
मिलनाची ओढ कळेल काय?

मिलनाची ओढ काय...
ते लाटांना विचारा...
अन भेटुन देखील...दुरावणे..
हे त्या किना-याला विचारा

त्या वाळुवर तुझे माझं नाव कोरताना..
कधी लाटांचा विचारच नाही केला..
की अशीच एखादी लाट येईल.
रोखुन नजर ...अन पुसुन टाकील क्षणार्धात...
ते तुझं माझं अस्तीत्व....रेघांच

माझ्या मनीच्या खोल गाभा-यात..
आजही लाटांसवेत गुंजणारी. तु...
त्या मावळतीच्या क्षितीजावर...
शिडासह....आजही भासणारी तु...

मावळतीच्या त्या सुर्याच्या साक्षीनं
आपण एक एक स्वप्न सजवलं..
अन त्याक्षणी...त्या क्षितीजावर..
एक चुकार पाखरु..अवचीत अडखळलं

खुळ्या वाटा...खुळ्याच लाटा...
अन मीही तसाच..
तु नाही येणार हे ठाऊक असतानाही...
उगाच तुझी वाट बघणारा

ओंकार

No comments:

Post a Comment