Friday, January 21, 2011

विषारी

तुझं खरचं
काही नाही चुकलं..

तु फक्त शब्दांना
त्यांच खरं रुप दाखवलं..

आता....प्रत्येकाचं...
प्रत्ये
कानं ठरवावं..
कोणतं रुप परकं...
नी कोणतं आपलं
शब्दांना रोखुन धरणे..
कोणाला जमणारं..
एक दार बंद झालं..की..
आणखी दहा दारं उघडणारं
काहींना विचार बोचतात..
काहींना विकार ....
शब्दच...सा-यांच्या मागे..
ते मात्र निर्विकारच राहातात.
खरचं..
काही मनं..
जाम...विषारी असतात..
वरुन दाखवतात एक...
अन आतुन....
वेगळेच असतात..
उल्लेख करुन बोलावं..
असं विशेष..स्थान नाही..
बस...नकळत अशी मनं
अधोरेखीत होऊन जातात...
काही मनं
खरचं विषारी असतात

ओंकार

No comments:

Post a Comment