Wednesday, January 19, 2011

कान्हा

ती मीराही तशीच
अन राधाही.
दोघीही दंग..
त्या श्यामनिळ्याच्या प्रेमात..
अन तो..
दोघींनाही गवसलेला..
वेगवेगळ्या रुपात...
मीरेला गवसला...
तो निळा...तिच्या भजनांत..
अन राधेला..
त्या वैजयंतीच्या माळेत...
कान्हा होताच..
त्या मोरपिसासारखा..
मुक्त.....मंजुळ...
पाव्यासारखा...
वेड लावणारा
ते उत्तरीय वा-याशी स्पर्धा करणारे..
अन पाव्याचे बोल...
अमृतालाही मागे सारणारे..
सारंच....खास..
त्या युगंधराच...
प्रेमही....मैत्रही....
अन सारे नियम तोडुन...
शत्रुत्वही.......


ओंकार

1 comment:

  1. These lines are just awesome dude .... keep writing such nice poems :)

    ती मीराही तशीच
    अन राधाही.
    दोघीही दंग..
    त्या श्यामनिळ्याच्या प्रेमात..
    अन तो..
    दोघींनाही गवसलेला..
    वेगवेगळ्या रुपात.

    ReplyDelete