Sunday, January 30, 2011

मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं.

सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं..

त्या शाळेतल्या....सगळ्या क्षणांना..

पुन्हा एकदा अभुवयाचयं..
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं.. सकाळची प्रार्थना....वर्गांतील तास..
सगळं...आयुष्य पुन्हा एकदा जगायचयं..
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.

मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

धावत जायचयं..त्या मैदानातल्या लाल मातीतुन..
प्रार्थनेला हात जोडुन उभं राहायचयं...
समुहगीत स्पर्धेतलं ते समुहगीत...मला खड्या आवाजात म्हणायचयं
नव्या को-या वहीवर...मोठ्या अक्षरात मला माझं नावं लिहायचयं
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

पेपर चालु असताना..चिंता..पेपर नंतरच्या मँचची...

चालु वर्गात...चिंता..मधल्या सुट्टीतील डब्याची...
सायकलच्या चाकांचा स्टंप.अन पँडची बँट करुन
क्रिकेट खेळायला जायचयं.

सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

पाऊस पडायला लागला...की आठवण यायची रस्त्याची...

सगळी कडे तुडुंब भरलेल्या...त्या कमरेपर्यंतच्या पाण्याची...
त्या तसल्या पाण्यातच का होईना
मला उगाच फुटबॉल खेळायला जायचयं.
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

तोच माझा बेंच...अन मिळुन तोडलेला पंखा...
त्याच बाई...शिंदे सरांचा तास.... इतिहासाचा
दिलेला गृहपाठ न केल्याने केलेली शिक्षा...
सारं पुन्हा एकदा अनुभवायचयं.
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

ओंकार

No comments:

Post a Comment