Tuesday, March 1, 2011

म्या पण साळेला जाणारं..

आजचं म्या ठरवलं..
म्या पण साळेला जाणारं..
माझ्या भावावानी...
म्या पनं..मोठी व्होणारं...
त्या गावातल्या पोरींसंगाती..
आज म्या दीसभर खेळणार..
नको तो खटारा सदीनाचा भांड्यांचा..
आज म्या बिगी बिगी सावरणार..
ए आये आज मी दादावानी
साळ्येला जाणार...
अग कारटे..
साळ्येला जाऊन कुनाचं भलं व्हुनार?
मी शेताला चाली..
मग भाकर पिठलं...कोन बनवनार?
म्या बाहेर पन बघाचं..नी घरी पन?
काय साळ्येला जायाचं नाही..
बस गुमान इथ्येच ...
आयी बापानं..
मला जाऊच दिलं न्हायं..
पनं म्या आज साळेला जाणारं..
साळ्येला जायाचं सपान माझं...
सपानचं राहुन गेलं...
तेच कायमच धुनं...
पुन्हा माझ्याच नशीबी आलं.

ओंकार..

भाषा थोडी गावाकडची लिहीण्याचा प्रयत्न केला आहे...अन तसा संबंध नाही माझा ह्या भाषेशी...तरी काही चुकले असल्यास सांगा...पुन्हा कधी तरी लिहीताना नक्की उपयोग होईल

2 comments:

  1. ह्म...! बाकी एकूण विकासाचा रोख बघता ती शाळेत न जाणं भलं. तिचे उपकार होतील आपल्यावर. (जरा वेगळी दिशा देतोय. माफी असावी.)

    ReplyDelete