तो असाच होता..
निर्झर झ-यासारखा...
खळखळता...
कश्यातही...
अगदी कश्यातही रमायचा...
अर्निबंध...सुटलेला...
वा-यासारखा...
कोणासाठी...जगणं,
त्याला जमायचं नाही....
अबोल होता...
तरी..एकांतात...बरेच काही बोलायचा...
खरडायचा...
कवीता करणं...
अहं....तितकं..भारी नाही...
बस....असचं काही ...
मनातलं...
कोणासाठी देखील नाही...
बस...आत उरात दाबुन टाकलेले...
सगळ्यांना...घाबरुन वागणारा...
अगदी स्वतःच्या सावलीलाही...
कधी कोणालाही वाटलेही नसेल ..
इतका हळवा होता..
बस...तो असाच होता......
बेफाम सुटलेला....
ओंकार
chhan ahe avadali ....... svatabaddal lihile ahes ka he ;)
ReplyDeletehmmmm purvicha omkar....
ReplyDelete