Heyyy...
Your Voice Is So "Romantic"....
M Not Joking Jaan....It's True..
नेहमीचा हा डायलॉग्....
आता सवय झाली होती.
हे ऐकायची...
हे ऐकल्याशिवाय दिवस पुर्ण व्हायचाच नाही..
तासंतास...फोन वर बोलणं..?
सुट्टीच्या दिवशी ,
घरी सगळे असायचे म्हणुन...
पि.सी.ओ. वरुन..."एका कॉईनमध्ये"...
बरेच काही बोलणं...
सगळेच स्वप्नवत....
खुप प्रेम केलं तिच्यावर....
कल्प्नेच्या पलिकडे...
कारण?...
अजुनही माहीत नाही...
स्वतःहुन जास्त जपलं...
अगदी नाजुक फुलासारखं..
तुला ....नात्याला..
इतके सारं छान चालु असताना...
शेवटी एक दिवस उजाडला...
निसटत्या वेळेसोबत...
कणाकणाने...सरत होतं...जगण्याचं ध्येय...
बदलत होतं...एक नातं...
तुटत होतं....एक काळीज...
कश्यापायी....कोणापायी...
ते तो देवचं जाणे...
बरेचसे वाद...उकरुन काढलेले..
बरेचसे आरोप...उगाचचं....
अगदी उगाच केलेले...
निरर्थक....बिनबुडाचे...
अन तेवढ्यात फोनची बेल वाजली...
नेहमीचाच नंबर...."ओळखीचा"
तो नंबर पाहुन
नेहमी मी मनापासुन खुष व्हायचो...
पण आज...
तो नंबर पाहुन...
मनावरची मळभट अधिकच वाढली...
नाखुषीनेच फोन उचलला....
"For The First Time...Was Not Smiling...
While Receiving That Phone"...
का?बोलावं....
अश्या दगाबाज बरोबर...
जिला माझ्या डोळ्यातलं पाणी...
माझा कातरं आवाज...
माझ्या स्वप्नांच्या चंदेरी काचा...
एकत्र जगण्याच्या आणाभाका....
ह्याची कहीच किंमत नव्हती...
जिव घुसमटत...होता...
तेवढ्यात समोरुन आवाज कानी पडला..
"M Not In A State To Talk With U"...
तुझा आवाज ऐकुन मला फ्रस्ट्रेशन होतेय
Im Getting.. "Irritated".....
मी दोन क्षण सुन्नच...
"तोच मी"....
"तोच आवाज"...
फक्त काळ पुढे निसटलेला..
"ROMANTIC"...."IRRITATING"....
दोन क्षण गप्प बसलो
And For The First Time,
I Have Disconnected The Phone...
मनावर दगड ठेवुन...
आणी तिला केलेला मँसेज...
"ह्याक्षणापासुन मी तुझ्यासाठी मेलो...पुन्हा कधीच मला कॉल करण्याचा प्रयत्न करु नकोस"....
"नातं संपलं नव्हतं...
संपवल गेलं..
एक फुल पुर्ण उमलण्या आधीच
पायदळी तुडवलं गेलं"
त्या खुळ्याची डायरी वाचता वाचता,
त्या सा-याशी कधी जोडला गेलो....
कळलेच नाही...
त्याच्या त्या पानावरच्या,
शेवटच्या ओळी वाचुन तर डोळे पाणावुन गेले...
"आता सगळचं संपलय"..
ओंकार
nice poem
ReplyDeletei m speechless :)
ReplyDeletegod bless u always...:)