Thursday, December 16, 2010

शितनिद्रा

गोठलेत अश्रू... 
गोठलेत श्वास ..
प्रत्येक श्वासांगणीक...
जगण्याचे भास..
वात थरथरतेय....विझण्यासाठी..
तरी का होतायत?
तुझ्या आसपास असण्याचे आभास
मोजमाप? 
आता कसलं?
कसलं....
तुझ्यावर मी केलेल्या प्रेमाचं...
नाही ते निदान ह्या जन्मी तरी शक्य नाही..
तुला कसं काय कळेल...
जोपर्यंत....
तु कोणावर तितके प्रेम करत नाही
काय करू आता तुझ्या सर्व पत्रांचा...
त्यांचा खच...
आता मनस्वी त्रास देतो...
ठरवतो..नाही आठवायचे तुला..
पण त्यातला एक एक शब्द...
तुझी आठवण करुन देतो
गोठवुन टाकायचयं...
त्या भळभळत्या जखमेला...
उगाच नंतर...त्रास व्हायचा...
त्या गाढ "शितनिद्रेत"..
पुन्हा कोणाच्या
उसन्या आसवांचे कर्ज नको डोक्यावर....
निदान तिथे तरी शांतता हवीय...
सर्व विसरुन टाकणारी...
शांत निजवणारी .....
"शितनिद्रा"

ओंकार

1 comment:

  1. निदान तिथे तरी शांतता हवीय...
    सर्व विसरुन टाकणारी...
    शांत निजवणारी .....
    "शितनिद्रा"

    good one

    ReplyDelete